Ad will apear here
Next
भारतीय संगीतातली मूलभूत अंगे वास्तुरचनेशीही निगडित : पं. सुरेश तळवलकर
‘बीएनसीए’तील कला व आर्किटेक्चर केंद्राचे उद्घाटन
‘बीएनसीए’तील कला व आर्किटेक्चर केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. शुभदा कमलापूरकर, डॉ. संजीवनी पेंडसे, आर्किटेक्ट राजीव मिश्रा, ‘बीएनसीए’चे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, डॉ. वसुधा गोखले व ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश तळवलकर आदी

पुणे : ‘भारतीय कला तसेच संगीतातली शास्त्र, तंत्र, विद्या आणि कलाही अंग वास्तुरचनाशास्त्रामध्येही (आर्किटेक्चर) येतात. यात अमूर्ताकडून मूर्ताकडे होत जाणारा भारतीय बंदिशीतला प्रवास वास्तुरचनाशास्त्राशी जवळीक साधणारा आहे. त्यातील आकृतीबंध हा रागाचे मापदंड आणि आकारमानाशी संबंधित असून, संगीताची निर्मिती ही वास्तुरचनेतील आकृतिबंधासारखी असते,’ असे मत ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केले.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील कला व आर्किटेक्चर या आंतरविद्याशाखीय केंद्राचे उद्घाटन पं. तळवलकर आणि महाराष्ट्र कला संचालनालयाचे संचालक आर्किटेक्ट राजीव मिश्रा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी तळवलकर बोलत होते. या वेळी ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, ‘बीएनसीए’चे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, शिक्षण विभागप्रमुख डॉ. शुभदा कमलापूरकर, आंतरविद्याशाखीय केंद्राच्या प्रमुख डॉ. संजीवनी पेंडसे, तसेच डॉ. वसुधा गोखले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

पं. तळवलकर पुढे म्हणाले, ‘संगीताचा परिणाम हा सूप्त मनापर्यंत गेला असल्यामुळे दर्जेदार वास्तूच्या निर्मितीची अभिव्यक्ती ही एखाद्या कसदार रागदारीसारखी होत जाते.’


डॉ. कश्यप म्हणाले, ‘कला व आर्किटेक्चरची मूलभूत तत्त्वे समान असून, त्यात नाद, ताल व आकृतीबंध यांचा समावेश होतो. कलांची अभिव्यक्ती ही ध्वनी, कागद यांच्या माध्यमातून, तर आर्किटेक्चरमध्ये वाळू, सिमेंट व विटा यांच्या माध्यमातून अभिव्यक्ती साकार होताना दिसते. हे लक्षात घेऊन देशातले असे पहिले आंतरविद्याशाखीय संशोधन केंद्र ‘बीएनसीए’मध्ये सुरू होत आहे. त्याचे सर्व कलांशी असणारे नाते अबाधित ठेवताना ते अभ्यास व संशोधनाच्या रूपातून वृद्धिंगत होईल.’  

आरती अंकलीकर-टिकेकर म्हणाल्या, ‘वास्तुरचनाशास्त्रातही भारतीय शास्त्रीय संगीताप्रमाणे सा-रे-ग-मसह कोमल व तीव्र असे १२ स्वर हे काल व अवकाशामध्ये अव्यक्त स्वरूपात असतात. राग सादर करणार्या् कलाकाराची तुलना विहंगावलोकनातून प्रत्ययाला येणार्याक एखाद्या सर्वांगसुंदर वास्तूसारखी असते. ज्यामध्ये त्या इमारतीतला प्रत्येक मजला हा सर्जनशीलतेच्या स्वर विचारांप्रमाणे काल व अवकाशाशी बांधला जातो, तर रागातील विलंबित ख्याल हा या इमारतीमागच्या विचारांचा भक्कम पाया म्हणून काम करत असल्याचे प्रतित होते. सांगीतिक विचारांचे हे भौतिक प्रकटीकरण वास्तुरचना करताना होत असते.’ 

महाराष्ट्राच्या कला संचालनालयाचे संचालक आर्किटेक्ट राजीव मिश्रा म्हणाले, ‘संगीत, कला आणि आर्किटेक्चर यांचे नाते एकमेकांना पूरक असते. यातूनच संगीत, नृत्यकला या ओघानेच वास्तूरचनेशी जोडल्या जाताना दिसतात. तसेच त्यांचे सादरीकरणही ऐतिहासिक वारसा सांगणार्याा वास्तूंपुढे संगीत व कला विविध महोत्सवांच्या माध्यमातून होताना दिसते. वास्तुरचनेचा सर्व कलांशी असणारा अन्योन्य संबंध लक्षात घेता आज दिल्ली व मुंबईप्रमाणे पुण्यातही अशा कला समितीची गरज आहे. यातून शहराची कलात्मक अभिरुची मूर्त स्वरूपात येताना ही कला समिती शहराच्या विविध जागांचा सांस्कृतिक कारणासाठी धोरणात्मक वापर करण्यास हातभार लावेल.’ 

दोन दिवसांच्या या परिसंवादात वास्तुरचनाशास्त्र आणि नृत्य यावर अभ्यासपूर्ण भाष्य करताना शर्वरी जमेनीस यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह विविध नृत्य प्रकारांचे सादरीकरण केले. 

गझल व टप्पा यांच्यासारख्या उपशास्त्रीय संगीतातूनही हे नाते स्पष्ट करता येते, असे प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यांनी सोदाहरण दाखवले.

‘भूदृश्य कला (लँडस्केपिंग) आणि शास्त्रीय संगीतातील बंदिशी यांची तर खास जवळीक आहे,’ असे गायिका डॉ. रेवा नातू म्हणाल्या. 

आर्किटेक्ट व बासरीवादक डॉ. सूज्ञा माहिमकर यांनी त्यांच्या वादनातून सांगीतिक अवकाश व वास्तुरचनेतील सर्जनता यांच्याशी असणारा संबंध उलगडून दाखवला, तर डॉ. सुषमा जोगळेकरांनी ओरिगामी हस्तकलेद्वारे भूमिती आणि वास्तूरचना यांचे नाते उलगडून दाखवले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZDDCH
Similar Posts
‘सूर्यदत्ता’च्या सुषमा चोरडिया यांना ‘सुपर वुमन अॅचिव्हर’ पुरस्कार पुणे : शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात येणाऱ्या ‘एशिया-अरब समिट अँड अॅवाॅर्ड्स’मध्ये ‘सूर्यदत्ता’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांना ‘सुपर वुमन अचिव्हर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच संस्थेच्या तीन इन्स्टिट्यूट्सना सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला
सूर्यदत्ता ठरला ‘बेस्ट इन्स्टिट्यूशनल ग्रुप इन महाराष्ट्र’ पुणे : माय ब्रँड बेटर आयोजित ‘इंडियन एक्सलन्स इन एज्युकेशन अॅवॉर्ड्स २०१९’मध्ये सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट’ला ‘बेस्ट इन्स्टिट्यूशनल ग्रुप इन महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘११ वी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ यावर व्याख्यान पुणे : ‘अकरावी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ या विषयावर ‘सीओइपिअन्स’तर्फे विवेक वेलणकर यांचे मोफत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे ते करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करत आहेत.
मीमांसा प्रश्नमंजूषा स्पर्धेसाठी प्राज आणि ‘आयआयएसईआर’चा करार पुणे : गेल्या १२ वर्षांपासून ‘आयआयएसईआर’तर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या मीमांसा या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या विस्तारासाठी यंदा प्राज इंडस्ट्रीज आणि ‘आयआयएसईआर यांनी एक सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार प्राज या स्पर्धेच्या तीन आवृत्त्यांसाठी तांत्रिक, तसेच आर्थिक सहाय्य देईल.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language